आमदार उदय सामंत यांनी घेतला विविध विकासकामांचा आढावा

0

रत्नागिरी : माजी मंत्री व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले असता, त्यांनी विविध विकासकामांबाबत आढावा घेतला. याचवेळी मोठ्या संख्येने रत्नागिरी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी आ. सामंत यांची भेट घेऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे रत्नागिरीचे आमदार व माजी मंत्री उदय सामंत हे शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी पाली येथील निवासस्थांनी अनेक पदाधिकारी व नागरिकांनी त्यांची भेट घेतली. दुपारनंतर आ. सामंत हे रत्नागिरीतील विश्रामगृहावर आल्याची माहिती मिळताच, शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी व नागरिकांनी त्यांची भेट घेत, त्यांना शुभेच्छा -देतानाच पुढील वाटचालीसाठी पाठिंबाही दिला.

आ. सामंत यांनी रत्नागिरीत आल्यानंतर बांधकाम विभाग, जिल्हा रुग्णालयासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विकास कामांबरोबरच जिल्हा रुग्णालयातील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने त्यांनी मुंबईतील अधिकाऱ्यांशी संपर्क करीत, डॉक्टरांची संख्या वाढावी यादृष्टीने आढावा घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीसाठी शासकीय मेडीकल कॉलेजला मंजुरी दिली असून, समितीही गठीत करण्यात आली आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने, जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रश्नही सुटणार आहे. जिल्हा रुग्णालयातील भुलतज्ज्ञांचा प्रश्न सुटावा यासाठीही आ. सामंत यांनी चर्चा केली. आ. सामंत यांच्या दौऱ्यामुळे रत्नागिरीतील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 23-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here